ज्ञानेश्वरी च्या पाचव्या अध्यायामध्ये वृक्षांची माहिती प्राचीन काळापासून!

एक पेड मा के नाम कार्यक्रमाच्या प्रसंगी ॲड. उमेश सावंत यांचे प्रतिपादन

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

वृक्षांची महती ही प्राचीन काळापासून ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्याय मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. म्हणूनच पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे असे प्रतिपादन कायदे तज्ञ ॲड. उमेश सावंत यांनी येथे बोलताना केले.
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन ॲड. श्री. सावंत यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, चेअरमन आर. एच. सावंत, खजिनदार गणपत सावंत, सदस्य तुषार सावंत, संतोष सावंत, पर्यवेक्षक बयाजी बुराण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अॅड. सावंत म्हणाले, ज्ञानेश्वरानी वृक्षवल्ली आम्हा सोयरी असे म्हटले आहे. म्हणजेच वृक्षाला आपलेसे केले आहे. वृक्षांना सोयरे म्हटले आहे. हा विचार आपण समजून घेतला पाहिजे. पृथ्वीचा समतोल बिघडत चालला आहे. परंतु, याचे ज्ञान आपल्याला प्राचीन ग्रंथातूनच मिळाले आहे. ही ग्रंथ संपदा आणि त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आजच्या पिढीने प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. सतीश सावंत यांच्या माध्यमातून आपल्याला दिलेले एक झाड म्हणजे एक पेड अपने माँ के नाम म्हणजेच आपण एका वृक्षाची जतन करणार आहोत. ते म्हणजे आपल्या आईच्या विचारांचे जतन करणार आहोत. हे लक्षात ठेवलं पाहिजे. राज्य शासन दरवर्षी हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र अशी योजना राबवत आहे. याच बरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माँ के नाम हा उपक्रम देशभर सुरू केला. या उपक्रमातून देशभरात दहा कोटी वृक्षलागवड होणार आहे. राज्यात एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ठ आहे. शासनाच्या पंचविस विभागाने हे उदिष्ठ वाटून देण्यात आले आहे. हा उपक्रम आपल्या शाळेने सुरू केला हे अभिमानास्पद आहे. खरतर ३३ टक्के क्षेत्र हे वृक्षलागवडीचे असले पाहीजे. पण, राज्यात केवळ २७ टक्के वनक्षेत्र आहे. राज्याला जागतिक बँकेने का ही अटी घातल्या आहेत. त्यात वृक्षलागवड ही एक अट आहे.
सतीश सावंत म्हणाले कनेडी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. परंतु, आजचा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आपली आहे. भविष्यातील पिढीचे रक्षण करणारा हा निसर्ग आहे. तो निसर्ग आपण जोपासला पाहिजे. म्हणूनच या वृक्षांचे वाटप करत आहोत. प्रत्येकाने आपल्या आईप्रमाणे या वृक्षाला जोपासावे, एक वृक्ष आपणासाठी खूप काही देऊन जाणार आहे. खऱ्या अर्थाने या वृक्षांमध्ये आपली आईच दडलेली असते, कारण गरम मसाल्यासारखी विविध रोपे जोपासून मोठे झाल्यानंतर त्यातून आपल्या आईला अनेक पदार्थ मिळतात. त्यामुळे तिची आठवण सातत्याने आपल्या जीवनात राहणार आहे. हे समजून घ्या, पर्यावरण रक्षण करत असताना आधुनिक जीवनशैली पासून दूर राहा. प्लॅस्टिकचा वापर करू नका. अधिकाधिक निसर्गासोबत प्रेम करा. निसर्ग समजून घ्या असे आवाहन त्यांनी केले. संस्थेचे चेअरमन आर.एच. सावंत यांनी प्रास्ताविक पर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद मसुरकर यांनी केले. त्यानंतर प्रशालेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला अॅड. सावंत यांच्या हस्ते वृक्ष वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!