मातृशक्तीचा अपमान केल्या प्रकरणी कुडाळात भाजपकडून काँग्रेसचा निषेध

भाजपच्या वतीने आज कुडाळ मध्ये बिहार निवडणूकीचा मुद्दा करून विष पेरून मातृशक्तीचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई संदर्भात चुकीची विधाने चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ केल्या प्रकरणी काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यात आला. ज्याने भारत मातेला कधी माता मानली नाही अशा लोकांकडून आणखी वेगळी कोणती अपेक्षा करणेच योग्य नाही. देशातील 140 कोटी जनता आईचा अपमान सहन करणार नाही, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी बंड्या सावंत, संध्या तेरसे, अदिती सावंत, आरती पाटील, मुक्ती परब, ज्योती जलवी, तेजस्विनी वैद्य, विशाखा कुलकर्णी, किरण शिंदे, उदय मांजरेकर, सचिन कळप, राजू गावंडे, दिगंबर गोवेरकर, विघ्नेश गावडे, सुनिल बांदेकर, निलेश परब, वैभव परब उपस्थित होते.

error: Content is protected !!