रिक्षा संघटनेच्या गणपतीकडे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांना आरतीचा मान

1982 साली स्थापन झालेल्या या संघटनेचे कै. श्रीधरराव नाईक होते जिल्हाध्यक्ष
कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक सार्वजनिक कला क्रीडा मंडळ कणकवली या मंडळाची स्थापना सन 1982 सालात करण्यात आली. त्याकाळी कै.श्रीधरराव नाईक हे रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते तर कै.राजेंद्र रावराणे हे रिक्षा संघटनेचे तालुकाध्यक्ष होते. कै.श्रीधरराव नाईक, कै.राजेंद्र रावराणे, अशोक करंबेळकर, सतीश नाडकर्णी, प्रभाकर कोरगावकर, प्रभाकर जोशी, किशोर साळगावकर यांनी कणकवलीत सार्वजनिक गणेश मंडळाचा पाया रोवला. या सर्व महनीय व्यक्तींनी कणकवलीत ऑटो रिक्षा चालक-मालक यांच्या 21 दिवसांच्या सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरवात केली.1982 सालात कणकवलीत फक्त 50 रिक्षा होत्या तर आता कणकवलीत सुमारे 600 रिक्षा व्यवसायिक आहेत.
ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेने प्रतीवर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील सुशांत नाईक यांना आरतीचा मान दिला. सुशांत नाईक यांनी ऑटो रिक्षा चालक-मालक यांच्या “कणकवलीच्या राजाची” आरती केली. सन 1982 सालापासून आता पर्यंत गेली 42 वर्षे या कणकवली च्या राजाची अविरत सेवा या ऑटो रिक्षा चालक-मालक या संघटनेकडून चालू आहे. भाविकांच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा अशी या कणकवली च्या राजाची महती सर्वदूर आहे. 21 दिवसात या मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये दशावतारी नाटक, डबलबारी, महिलांसाठी खेळ पैठणीचा, रिक्षा चालकांच्या मुलांचा गुणगौरव असे विविध कार्यक्रम या 21 दिवसात संपन्न होतात.
यावेळी ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष बाळा वराडकर, उपाध्यक्ष अरुण परब, संतोष सावंत, उदय मोर्ये, मनोज वारे, महेश आमडोस्कर, संदीप घाडी, सरंगले, भरत तळवडेकर, रमेश आरोलकर, रुपेश मगम, सखाराम राणे, दिनेश वराडकर, पेडणेकर हे मंडळी आता कार्यरत आहेत.यावेळी आदी रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.





