हिर्लेवाडी बीएस एन एल टॉवर कार्यान्वयित

ग्रामस्थांमधून समाधान


नेटवर्क पासून वंचित असलेल्या हिर्लेवाडी भागातील बीएस एन एल टॉवर बुधवारी आचरा सरपंच यांच्या उपस्थितीत कार्यान्वयित करण्यात आला. आणि हिर्लेवाडी भागात मोबाईल रींग खणखणली.
आचरा सरपंच जेरान फर्नांडिस यांच्या हस्ते टॉवर कार्यान्वयित करण्यात आला. यावेळी हिर्लेवाडी ग्रामस्थ मंडळाचे पांडूरंग वायंगणकर, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, जयप्रकाश परुळेकर, विकास सोसायटी चेअरमन अवधूत हळदणकर, विलास मुणगेकर यांसह हिर्लेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
आचरा हिर्लेवाडी भागात मोबाईल नेटवर्क पोहचत नसल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत आचरा सरपंच जेरान फर्नांडिस यांनी पाठपुरावा करत याभागात मोबाईल टॉवर सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. बुधवारी बीएसएनएल मोबाईल टॉवर सुरु झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!