शेठ न. म. विद्यालय खारेपाटण च्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप

ब्युरो व्हेरिटास इंडिया व सेवा सहयोग फाउंडेशन (मुंबई) संस्थेचा उपक्रम

मुंबई, अंधेरी येथील ब्युरो व्हेरिटास इंडिया कंपनीच्या सीएसआर फंडातून व सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालय या प्रशालेतील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी ब्युरो व्हेरिटास इंडिया कंपनीच्या हेड ऑफ प्रोक्यूरमेंट शांता पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
शेठ न.म.विद्यालय खारेपाटण च्या रायबागकर सभागृहात खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, संचालक श्री. विजय देसाई यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला ब्युरो व्हेरिटास इंडिया कंपनीचे हेड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन श्री. मिलिंद पाटील तसेच खारेपाटण हायस्कूलचे माजी विद्यार्थी व कंपनीचे ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजर श्री. पुरुषोत्तम देवधर, सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई या सामाजिक संस्थेचे श्री. विशाल देसाई श्री. गणेश भाभल, खारेपाटण हायस्कूलचे प्राचार्य श्री. संजय सानप पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
यावेळी शेठ न. म. विद्यालय खारेपाटण च्या वतीने श्री. प्रवीण लोकरे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी व कंपनीचे ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजर श्री.पुरुषोत्तम देवधर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ब्युरो व्हरायटीज इंडिया कंपनी व सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे यांनी आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!