तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल वरवडेच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

कणकवली/मयूर ठाकूर
शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत नुकत्याच सेंट उर्सुला स्कूल वरवडे येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज वरवडे च्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले आहे.आपल्या अचूक आणि शिस्तबद्ध खेळाच्या जोरावर 17 वर्षाखालील गटातील मुलांच्या संघाने विजेतेपदावर आपली मोहर उमटवली आहे, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल संघासमोर त्यांनी ही विजयश्री खेचून आणली तर 19 वर्षाखालील मुलांच्या गटात अटीतटीच्या लढतीत संघास उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. कणकवली कॉलेज कणकवलीच्या संघाने ही लढत जिंकली.
14 वर्षाखाली मुलांच्या गटात संघाला उपविजेतेपद प्राप्त झाले आपल्या सांघिक खेळाच्या जोरावर आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज वरवडे च्या विदयार्थ्यांनी तिहेरी यश मिळवून दिले,या विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.विद्यार्थ्यांना आयडियल इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक योगेश सामंत सर, श्री.वासुदेव दळवी सर,जिष्णा नायर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर सर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार डी.पी तानावडे सर,मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.





