असलदेत बिबट्याचा वावरामुळे भीतीचे वातावरण

बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, ग्रामस्थांची मागणी
तालुक्यातील असलदे गावातील दिवानसानेवाडी, गावठणवाडी परिसरात गेले काही दिवस बिबटयाचा मुक्त वावर सुरू आहे. रविवारी सायंकाळी दिवानसानेवाडी येथील भरवस्तीत बिबटयाचे दर्शन झाले. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दिवानसानेवाडी, गावठणवाडी परिसरात बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांना शेतीचे काम धोकादायक बनले झाले आहे. बिबट्या वारंवार भरवस्तीच्या दिशेने येत असतो. त्यामुळे बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्याने पाळीव पशू, प्राण्यांसह मनुष्यावर हल्ला केल्यास त्याला वन विभाग जबाबदार राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.





