आत्माराम उर्फ बंडू लाड यांची महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती शिवडाव च्या अध्यक्षपदी ग्रामसभेत सर्वानुमते फेरनिवड.

मागील कार्याचे केले गावकऱ्यांनी कौतुक.
कणकवली/प्रतिनिधी
शिवडाव गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी आत्माराम उर्फ बंडू हरिश्चंद्र लाड यांची नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते ठराव घेऊन फेरनिवड करण्यात आली.मागील वर्षी असंख्य अर्ज तंटामुक्ती समितीकडे प्राप्त झाले होते.हे सर्व तंटे तातडीने आणि मैत्रीपूर्ण सामंजस्याने तोडगे काढत तंटामुक्तीच्या सभेमध्ये मिटवण्यात आले.गावात असलेला उत्तम लोकसंपर्क आणि गावकऱ्यांशी असलेला सलोखा तसेच कुठलाही भेदभाव न करता आलेला तंटा सामंजस्याने तडीस नेण्याचे असलेले कौशल्य या सर्वाचा विचार करता आणि मागील वर्षी केलेल्या कार्याची दखल घेत नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये बंडू लाड यांची फेरनिवड करण्यात आली.
यावेळी गावचे सरपंच,उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामविकास अधिकारी,गावचे तलाठी,सोसायटी अध्यक्ष,पोलीस पाटील,ग्रामपंचायत कर्मचारी,आरोग्य अधिकारी गावच्या जिल्हा परिषद तथा माध्यमिक शाळांचे शिक्षकवर्ग,प्रतिष्टीत नागरिक तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसंगी ग्रामपंचायतच्या वतीने बंडू लाड यांचे अभिनंदन करण्यात आले असून अध्यक्षपदी फेरनिवड केल्याबद्दल आत्माराम उर्फ बंडू लाड यांनी सर्वांचे आभार मानले





