दशावतार कलाकार आरोग्य शिबीर चे 10 सप्टेंबर रोजी आयोजन

कणकवली तालुक्यातील दशावतार कलाकारांची आरोग्य तपासणी बुधवार दि. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10-00 वाजता होणार आहे. तरी सर्व कलाकारांनी दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी उपजिल्हा रुग्णालय कणकवली हॉस्पिटल मध्ये वेळीच उपस्थित रहावे. येथे सर्व तपासण्या केल्या जाणार आहेत. तरी, येताना अगोदरचे काही ट्रिटमेंट चालू असेल तर रिपोर्ट घेऊन येणे, तसेच आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड काढवयाचे असल्यास आधार कार्ड व रेशनकार्ड घेऊन येणे. वेळ- सकाळी 10 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत ही शिबिर होणार आहेत.





