मालवण पंचायत समिती पेन्शन अदालत संपन्न.

पं.स.मालवण येथे आयोजित करण्यात आलेल्या पेन्शन अदालती मध्ये वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी सर्व खात्याचे खाते प्रमुख यांची गटविकास अधिकारी .श्याम चव्हाण यांचे अध्यक्षते खाली सभा संपन्न झाली प्रथम माजी ग.वि.अधिकारी कै बी.आर.माणगावकर यांच्या अकाली निधना बद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर मालवण पंचायत समितीकडे नव्याने हजर झालेले ग.वि.अधिकारी मा.श्याम चव्हाण यांनी नियोजनबद्ध आयोजित केलेल्या या पेन्शन अदालतीबद्दल सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रकाश राणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला प्रथम से.ग्रा.सं महा संघाचे तालुकाध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी प्रास्ताविक केले जिल्हा अध्यक्ष प्रकाश राणे यांनी आपले विचार व्यक्त केले शिक्षक संघटना प्रतिनिधी चौधरी यानीही आपले विचार व्यक्त केले तसेच सर्व संघटना पदाधिकारी यांनी ही आपणाला येत असलेल्या अडचणी विशद केल्या त्यानंतर सर्व खातेप्रमुखानीआपणकरत असलेल्या कार्यवाहीबद्दल माहीती दीली काही प्रश्न प्रलंबीत आहेत ते प्रश्न पुढील अदालती पुर्वी पुर्ण कराव्यात अशा सुचेना ग.वि.अधि..श्याम चव्हाण यांनी खातेप्रमुखाना दिल्या व सर्व संघटनांचे पदाधिकारी आपणाला देत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले व यापुढे आपले प्रश्न प्रलंबीत राहाणार नाहीत याची ग्वाही दिली व आपणास आपले पुर्ण सहकार्य राहील असे सांगून सर्वांचे आभार व्यक्त केले या सभेस प्रकाश राणे, हनुमंत प्रभू , अशोक ओटवणेकर,कारवालो,गवंडे,बाबुपरुळेकर,शेलटकर, व्हीकेजाधव,सुनिल चव्हाण, पं.वि.अधि.हांडे,परब, तांबे म्याडम,धुरी ,खडपकर मंगेश गोसावी आदी उपस्थित होते





