विनापरवाना दारू वाहतूक प्रकरणी मनोज जाधव याची निर्दोष मुक्तता

संशयित आरोपीच्या वतीने ॲड. भालचंद्र पाटील यांचा युक्तिवाद
महामार्गांवर वाहन अतिवेगात चालवून व त्यामुळे वाहनावरील चालकाचा ताबा सुटून अपघात होऊन महामार्गलागत असलेल्या दुचाकीना धडक देत नुकसान केल्याप्रकरणी तसेच वाहनातून विनापरवाना दारू वाहतूक केल्याप्रकरणी मनोज रामचंद्र जाधव याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. संशयित आरोपीच्या वतीने ॲड. भालचंद्र पाटील यांनी युक्तीवाद केला. त्याच्या विरुद्ध भा. द. वि. कलम 279, 427, मोटार वाहन कायदा कलम 184, व महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अ व ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. ही घटना 22 एप्रिल 2022 रोजी घडली होती.
सदर प्रकारणामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले.सदर कामी समोर आलेला पुरावा आरोपीला दोषी ठरविण्यासाठी पुरेसा नसल्याने तसेच आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून कणकवली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शुभम लटुरिया यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अँड .भालचंद्र पाटील यांनी काम पाहिले.





