खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत यांच्यावर वाढदिवस दिनी शुभेच्छाचा वर्षाव

खारेपाटण गावचे माजी सरपंच व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाज बांधव संघटनेचे अध्यक्ष व खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष श्री. रमाकांत राऊत यांच्या १ सप्टेंबर या वाढदिनी सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.
तर विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मस्त्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी देखील श्री. रमाकांत राऊत यांनी दूरध्वनी द्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच त्यांच्या वाढदिवसा निमित्त खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर व उपसरपंच श्री. महेंद्र गुरव आणि ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वर्गाच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. याबरोबरच त्यांच्या समाजबांधव व कुटुंबियांच्या वतीने देखील त्यांचा ५८ वा वाढदिवस उस्ताहात साजरा करण्यात आला.

error: Content is protected !!