शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण येथे श्री केदारेश्वर धनी रवळनाथ मंदिरात अभिषेक पूजा संपन्न

शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे यांचा वाढदिवस खारेपाटण येथे आज धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन करून साजरा करण्यात आला. खारेपाटण चे ग्रामदैवत श्री केदारेश्वर धनी रवळनाथ या मंदिरात सकाळी आठ वाजता सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांच्यासह तालुकाप्रमुख श्री मंगेश गुरव यांनी उपस्थित राहत श्री केदारेश्वर धनी रवळनाथ चरणी अभिषेक करण्यात आला व संजय आंग्रे यांच्या दीर्घायुष्यासाठी व यशस्वी राजकीय वाटचालीसाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.
यावेळी शिवसेना कणकवली तालुका प्रमुख श्री. मंगेश गुरव, विभाग प्रमुख श्री. गुरुप्रसाद शिंदे शहर प्रमुख श्री. सुहास राऊत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री. मंगेश ब्रम्हदंडे, महिला शहरप्रमुख अस्ताली पवार, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





