बॅ. नाथ पै महिला महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाचे बहिस्थ विज्ञान (बी.एस्सी) पदवी केंद्र सुरू

बॅरिस्टर नाथ पै कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय कुडाळ येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे बहिस्थ विज्ञान (बी. एस्सी) पदवी केंद्र सुरू झाले असून बहिस्थ (एक्स्टर्नल) बी.एस्सी करणाऱ्यांसाठी एक सुसंधी या निमित्ताने प्राप्त झाली आहे.
बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने सिंधुदुर्गवासियांसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक शै. सुविधा पुरविणारे नर्सिंग महाविद्यालय फिजीओथेरपी महाविद्यालय, बीएड महाविद्यालय,महिला महाविद्यालय, रात्र महाविद्यालय सी.बी.एस.ई सेंट्रल बोर्डाचे सेंट्रल स्कूल, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे एम ए एज्युकेशन, शालेय व्यवस्थापन पदविका, योग डिप्लोमा, एम ए इन योगा असे विविध शैक्षणिक सुविधा पुरवणारे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.जेणेकरून शैक्षणिक उन्नती करता करता प्रामुख्याने आरोग्यविषयक पदवी शिक्षण घेता येईल की जे विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या उपयोगी पडेल. याची प्रचिती कोरोना काळात सिंधुदुर्गवासियांना आली आहे.
बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग कॉलेज, फीजिओथेरपी कॉलेजच्या, महिला कॉलेजच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या नेतृत्वाखाली कोविड सेंटर सुरू करून कोरोनाग्रस्त व क्वारंटाईन व्यक्तींना, समाजाला माणूसकीच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने जी मदत केली ती वाखाणण्याजोगी आहे.
असाच उद्देश समोर ठेवून बारावी सायन्स झालेल्या व नोकरी व्यवसायात अडकलेल्या विद्यार्थ्यांना बी.एस्सी पदवी कॉलेज नियमित असल्यामुळे इच्छा असूनही बी.एस्सी होता येत नव्हते. ही गैरसोय दूर होऊन बारावी सायन्स झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी व्यवसायसांभाळून बहिस्थ स्वरूपात बी..एस्सी पदवी घेता येणार आहे. तरी इच्छुकानी अधिक माहितीसाठी केंद्रप्रमुख अरुण मर्गज मोबाईल 942330 2859 व केंद्र संयोजक नितीन बांबर्डेकर मोबाईल नंबर 9325104684 यांच्याशी संपर्क साधावा व या सुसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व केंद्रप्रमुख प्राचार्य अरुण मर्गज, केंद्र समन्वयक प्रा.नितीन बांबर्डेकर यांनी केले आहे.





