श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये रक्तदान शिबीर

इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक माजी आमदार कै. पुष्पसेन सांवत यांच्या जयंतीनिमित्त श्री.पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी,हुमरमळा येथे नुकतेच रक्तदान शिबिर पार पडले. सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा शासकिय रक्तपेढी यांच्या सहयोगातुन आयोजित या शिबीरात विद्यार्थी व कर्मचारी मिळुन 16 जणांनी रक्तदान केले.
शिबीराच्या यशस्वीतेसाठी संस्था परिसर संचालिका सौ. नुतन परब, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.युवराज पांढरे यांचे विषेश मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम प्रमुख, अधिव्याख्याता गणू गावडे व सहकारी तसेच महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी कार्यक्रम शिस्तबद्ध व योग्यपद्धतीने पार पाडण्यात मोलाची भूमिका निभावली.
error: Content is protected !!