राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांनी घेतले कुडाळ-वेंगुर्ला-सावंतवाडी येथील पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या घरी विराजमान बाप्पांचे दर्शन.

कणकवली/प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो.गावा-गावात घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमार्फत अवघ्या जगताच आराध्य दैवत असलेल्या गणपती गजाननाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून गणरायाची पूजा-अर्चा केली जाते.
नुकतेच राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांनी कुडाळ-वेंगुर्ला-सवंतवाडी येथील पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या घरी विराजमान बाप्पांचे दर्शन घेतले.पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी,तसेच घरगुती चर्चा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.यावेळी जिल्ह्यातील जनतेला सुख,समाधान,समृद्धी तसेच निरोगी आयुष्य मिळावे आणि जिल्ह्यातील तरुणांना रोजगार प्राप्त व्हावा तसेच पर्यटन दृष्ट्या संपन्न असलेल्या या जिल्ह्याची आर्थिक गती वाढावी यासाठी बाप्पाकडे साकडे घालण्यात आले.प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सुभास उर्फ बाबू सावंत,प्रदेश चिटणीस एम.के.गावडे,जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे,जिल्हा सचिव सुशील चमणकर, युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर,राष्ट्रवादी पदाधिकारी अनंतराज पाटकर,कणकवली शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले,कणकवली शहर सरचिटणीस विशाल पेडणेकर,कुडाळ तालुका अध्यक्ष आर.के.सावंत,राष्ट्रवादी कार्यकर्ते शुभम ठाकूर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!