सिने अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी घेतले कणकवलीतील संतांच्या गणपतीचे दर्शन

नागेश्वर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आला सत्कार
मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते पुष्कर शोत्री यांनी आज कणकवलीतील टेंबवाडी मधील मनाच्या संतांच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांचे नागेश्वर मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करण्यांत आले. त्यावेळी संतोष राणे, महेश सावंत, अभय राणे, औदुंबर राणे, मंडळाचे अध्यक्ष सुधाकर राणे, ओंकार राणे, व्यंकटेश सावंत, बाबू आर्डेकर, सागर राणे, संतोष पुजारे, साईनाथ जळवी, विजय राने, दिगंबर राणे, प्रसाद सावंत, शिवगण केतन जोगळे तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.





