वायंगणी येथे घरोघरी गौराईचे उत्साहात आगमन

कणकवली तालुक्यातील वायंगणी येथे रविवारी दि. ३१ ऑगस्ट ला सकाळी घरोघरी भाद्रपद शुद्ध सप्तमीला पान गौराईजे आगमन झाले. आगमन झाल्यानंतर उद्या गौरी पूजन केले जाते. गौरी गणपती च्या आगमनाने घराघरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गौरी पूजनापूर्वी गौरी आवाहन दिवशी पान गौरी महिला व मुली वा्यंगणी येथील आदिनाथ मंदिराच्या शेजारी वाहणारा आपल्या जवळच्या पाणवठ्यावर ओहोळ्याच्या ठिकाणी जाऊन पूजा करून तुळस, आगाडा, हळदीचे रोपे, तिरडा, भाजीचे रोप याची विधिवत पूजा व आरती करून तीने रोपे तांब्यात पाच दगड व पाणी टाकून ते सर्व रोप टाकून न बोलता घरी आणला जातो. त्याचबरोबर प्रत्येक भागात विविध चालीरीती प्रमाणे गौराईला घरी आणत गौरीचे स्वागत करताना, ज्या स्त्रीच्या हातात गौरी असतील, तिचे पाय पाण्याने धुवून औक्षण करत घराच्या उंबऱ्यापासून ते गौरी बसवण्याच्या जागेपर्यंत कण्याचे ठसे उमटवत आणले जाते.
गौरी पूजनाच्या दिवशी गौरींना साडी नेसवून, दागिने आणि मुखवटा घालून सजवले जाते. या दिवशी गौरींना भाजी- भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. गौराई घरी आल्यानंतर घरात समृद्धी येते अशी लोकांची श्रद्धा असून पुढे गौरी गणपती च्या समोर फुगड्या व भजने करीत गौराईचा जागर केला जातो.





