अनेक वर्षानतर जादूगार रघुवीर आज सावंतवाडीत

मुलांना दिले शिक्षणाबरोबर जादूचे धडे
आज बॅरिस्टर नाथ पै सभागृहात रंगणार जादूचे खेळ
बच्चे कंपनीत मोठी उत्सुकता
जादूच्या दुनियेतील थरार… मायाजालाचा अद्भुत अनुभव… आणि विद्यार्थ्यांसाठी ज्ञानासोबत मनोरंजनाची अनोखी मेजवानी! जगप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी सिंधुदुर्गातील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाला भेट देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. जादूच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन करतानाच त्यांनी शिक्षण, अभ्यास, परीक्षेची तयारी आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्वही पटवून दिले. शालेय जीवनात अभ्यासाला प्राधान्य द्या, आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा आणि व्यसनांपासून नेहमी दूर राहा, असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.विशेष म्हणजे, जादूगार जितेंद्र रघुवीर यांनी विद्यार्थ्यांना विविध जादूच्या प्रयोगांची माहिती देत जादूच्या दुनियेतील काही रंजक पैलू उलगडून दाखवले. त्यांच्या या अनोख्या संवादामुळे विद्यार्थीही अक्षरशः भारावून गेले. शिक्षण आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या या भेटीने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
आणि आता हीच जादू अनुभवण्याची संधी थेट सावंतवाडीकरांना मिळणार आहे. यावेळी जादूगार यांचा सत्कार संस्थेच्या सचिव साईनाथ नार्वेकर,मुख्याध्यापक संजय पिळणकर, पर्यवेक्षक सी.डी. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.जगप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा थरारक ‘मायाजाल’ हा भव्य जादूचा शो आज सावंतवाडीतील बॅरिस्टर नाथ पै नाट्यगृहात आज रंगणार आहे. अनेक सेलिब्रिटींकडून गौरविलेल्या या शोमध्ये जादूचे थरारक प्रयोग, अचंबित करणारे सादरीकरण आणि मनोरंजनाची अनोखी दुनिया अनुभवायला मिळणार आहे.
या शोचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे तब्बल नऊ फुटांचा जपानी डायनासोर आणि डेडपूल! त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा शो एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.आज प्रेक्षकांसाठी एकूण दोन खास प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. आज सायंकाळी चार वाजता आणि साडेसात वाजता हे प्रयोग सादर होणार आहेत.या शोसाठी व्हीआयपीसह ५००, ४०० आणि ३०० रुपयांची तिकीट व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शालेय विद्यार्थ्यांना तिकिटावर १०० रुपयांची विशेष सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांसोबत या जादुई दुनियेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.तिकिटांची विक्री सावंतवाडीतील राजश्री फोटो स्टुडिओ येथे सुरू असून, ऑनलाइन तिकिटांसाठी बुक माय शोवर संपर्क साधता येणार आहे. व्हीआयपी तिकीट आणि फोन बुकिंगसाठी ९८२३७१९७२७, ९८२२५५६३२४ आणि विकास पावसकर यांच्याशी ९९२०६२९९२३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.तर सावंतवाडीकरांनो, तयार व्हा जादूच्या अद्भुत दुनियेत हरवून जाण्यासाठी!जादूगार जितेंद्र रघुवीर यांचे थरारक ‘मायाजाल’, नऊ फुटांचा जपानी डायनासोर आणि डेडपूल यांची धमाल अनुभवण्याची ही संधी चुकवू नका असे आवाहन जादूगार रघुवीर च्या वतीने विकास पावसकर यिंनी केले आहे.बॅरिस्टर नाथ पै नाट्यगृह सावंतवाडी येथे आज जादू, थरार आणि मनोरंजनाची अनोखी मेजवानी छोट्या बच्चे कंपनीला पाहता येणार आहे.






