सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन अंतर्गत ४ सप्टेंबरला रक्तदान शिबिर

फ्रेंडस गृप, दुर्गवाड यांचे आयोजन

कुडाळ : सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन अंतर्गत गुरुवार दि. ०४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता फ्रेण्ड्स ग्रुप, दुर्गवाड यांच्या वतीने शाह दावल मलिक दर्गाह येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढते. याच काळात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रवाशांची संख्याही वाढल्याने रक्ताची मागणी प्रचंड वाढलेली असते. सध्या जिल्हा रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने सिंधुदुर्ग मिल्लत फाऊंडेशनतर्फे दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी कुडाळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तब्बल ५० रक्तदात्यांनी बहुमोल रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.
सिंधुदुर्ग मिल्लत फाऊंडेशन दरवर्षी जिल्ह्यात नियमितपणे रक्तदान शिबिरांचे आयोजन करत असते. त्याच परंपरेत गुरुवार दि. ०४ सप्टेंबर २०२५ रोजी फ्रेण्ड्स ग्रुप, दुर्गवाड यांच्या वतीने शाह दावल मलिक दर्गाह येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबीर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहील.
नेरूर, सरंबळ, सोनवडे, दुर्गवाड आणि पंचक्रोशीतील तरुणांनी या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी जुहेल नाईक (84080 43216) यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!