नडगिवे गावच्या म.गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत मण्यार यांची निवड

कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी येथील ग्रामस्थ श्री. चंद्रकांत सुरबाजी मण्यार पाटील यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
नडगिवे गावच्या ग्रामपंचायतीची वार्षिक जनरल सभा नुकतीच गावच्या सरपंच श्रीम माधवी मण्यार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ग्रामपंचायत कार्यलयात संपन्न झाली.यावेळी गावच्या म. गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी श्री. चंद्रकांत मण्यार यांची निवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच श्री. भूषण कांबळे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
	




