आयनल येथील नवरात्रोत्सव साजरा करण्यास पार्टी नंबर १ ला परवानगी

पार्टी नंबर 1 च्या वतीने ऍड. उमेश सावंत व ऍड. सुहास साटम यांनी केला युक्तिवाद

आयनल येथील श्री देव नागेश्वर पावणादेवी देवालयातील नवरात्र उत्सव पार्टी नंबर १ चे सुर्यकांत साटम बगैरे ५ यांनी ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत साजरा करावा. नवरात्रोत्सव साजरा करताना शांतता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पार्टी नंबर १ मधील प्रवीण साटम व पार्टी नंबर २ यांना उत्सवात सहभागी होण्यास हरकत नसल्याचे आदेश कार्यकारी दंडाधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी दिले आहेत. पार्टी नंबर १ च्यावतीने अॅङ उमेश सावंत व अॅङ सुहास साटम यांनी काम पाहिले.

आयनल येथील येथील श्री देव नागेश्वर पाणादेवीच्या नवरात्रोत्सावरून पार्टी नंबर १ चे सूर्यकांत साटम वगैरे ५, पार्टी नंबर २ चे संदेश साटम बगैरे ९ तसेच पार्टी नंबर १ मधील प्रवीण सामट यांच्यात मानपानावरून वाद आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक यांनी कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करून कलम १६३ नुसार बंदी आदेश लागू करण्याबाबतची शिफारस केली होती.

दरम्यान याप्रकरणी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली. यात पार्टी नंबर १, पार्टी नंबर २ व पार्टी नंबर १ मधील यांनी आपापला युक्तीवाद केला. सुनावणीअंती कार्यकारी दंडाधिकारी यांनी यापूर्वीचा जिल्हा न्यायालयाचा आदेश, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांच्याकडील २०२५ चा रिष्हिजन अर्ज, उपविभागीय अधिकारी यांचेकडील सन २०२४ च्या होळी उत्सवाबाबत दिलेला आदेश, तसेच सन २०१८ पासून होळी, देवदिपावली, जत्रोत्सव व नवरात्रोत्सव यावेळी देण्यात आलेले आदेश यांचा आधार घेत वरील आदेश व लोकभावना याचा विचार करणे आवश्यक असून वरील आदेशानुसार आज पावतो गावात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. त्यामुळे आयनल येथील नवरात्र उत्सवात कलम १६३ नुसार बंदी घालणे करिता पुरेसे सबळ कारण दिसून येत नाही. त्यामुळे कार्यकारी दंडाधिकारी यांनी पार्टी नंबर १ यांना सदर उत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे.

error: Content is protected !!