शेर्पेत ७९ असाक्षर झाले साक्षर

भारत सरकारने भारतातील नागरिकांसाठी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामार्फत ऑनलाइन ऑफलाइन प्रक्रियेद्वारे निरक्षरांना साक्षर करण्यासाठी 2022 ते 2027 या पाच वर्षाचा कालावधी मध्ये एक कलमी कार्यक्रम आखला होता. त्यामध्ये सन 2023 मध्ये शेर्पे गावातील निरक्षरांचे सर्वेक्षण केंद्रशाळा शेर्पेच्या वतीने करण्यात आले. सर्व वयोगटातील 79 असाक्षर शेर्पे गावांमध्ये मिळून आले होते .स्वयंसेवकांच्या मदतीने आणि शेर्पे गावातील केंद्रशाळा शेर्पे या शाळेतील शिक्षक वृंद व माध्यमिक विद्यालय शेर्पे चे शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने आणि केंद्रशाळा शेर्पे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे व शेर्पे माध्यामिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हिदायत अत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील 79 निरक्षर साक्षर करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले .परीक्षापूर्वी पूर्वतयारी संपूर्ण करण्यात आली. स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्यात आले. पर्यवेक्षकांनी संपूर्ण जबाबदारी सक्षमपणे पार पडली. आणि शेर्पे गावातील 79 असाक्षर परीक्षेला प्रविष्ट झाले . १०० टक्के असाक्षर पास झालेले आहेत. ही बाब अभिनंदननीय आहे. या साक्षर झालेल्या बहुतांशी म्हणजे 95% महिला भगिनीच आहेत. अल्प प्रमाणात 5%पुरुष आहेत. उल्हास नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत निरक्षरांना साक्षर करण्यासाठी मार्गदर्शक आणि संपूर्ण जबाबदारी शेर्पे गावाच्या वतीने यशस्वी पणे पार पाडली. ते केंद्रशाळा शेर्पे चे मुख्याध्यापक – दशरथ शिंगारे , शेर्पे हायस्कूलचे मुख्याध्यापक – हिदायत आत्तार ,सर्वेक्षक व स्वयंसेवकांना मार्गदर्शक म्हणून ज्यांनी काम केले ते शिक्षक वृंद -तुषार तांबे ,योगिता बंडगर , मोहिनी पाटील , अमरीन शेख, कविता हरकुळकर ,शांतीलाल कापसे , रंजना राणे , शितल कुलकर्णी ,पोर्णिमा भागवडे ,यांनी विशेष परिश्रम घेतले. तर स्वयंसेवक म्हणून महिमा शेलार, तस्मिया मनाजी ,रजिया जैतापकर ‘फरीदा रमदुल, स्वरा पाटणे, मंगेश गुरव यांनी काम पाहिले. तसेच शेर्पे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यानीही स्वयंसेवक म्हणून योगदान दिलेले आहे. शेर्पे गावाला दिलेले उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल निरंतर शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांच्यावतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आलेले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर ,शिक्षणाधिकारी -गणपती कमळकर ,कविता शिंपी गटशिक्षणाधिकारी -किशोर गवस , विस्ताराधिकारी -रामचंद्र नारकर व केंद्रप्रमुख संजय पवार यांनी शेर्प गावातील सर्व साक्षर झालेल्या असाक्षरांचे व शेर्पे गावाला दिलेले उद्दिष्ट १००%पूर्ण केल्याबद्दल केंद्रशाळा शेर्पे चे मुख्याध्यापक व शिक्षकवृद शेर्पे हायस्कूल चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद , सर्व स्वयंसेवक यांचे विशेष अभिनंदन केलेले आहे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत भारत सरकारकडून शेर्पे गावातील शंभर टक्के उत्तीर्ण झालेल्याना प्रमाणपत्राचे वाटप तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र नारकर , मुख्याध्यापक दशरथ शिंगारे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष -प्रताप राऊत व शिक्षक वृंद इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.





