नांदगाव,तळेरे परीसरात घरोघरी गौराईचे आगमन

गणेश चतुर्थीनंतर येणारा गौरी आगमन हा सुद्धा एक महत्त्वाचा सण आहे. रविवारी सकाळी  नांदगाव, तळेरेसह जिल्ह्यात घरोघरी भाद्रपद शुद्ध सप्तमीला पान गौराईजे आगमन झाले. आगमन झाल्यानंतर उद्या गौरी पूजन असल्याने तीन दिवस चालणा-या या  सणात घराघरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गौरी पूजनापूर्वी गौरी आवाहन दिवशी पान गौरी महिला व मुली आपल्या जवळच्या पाणवठ्यावर जात तुळस, आगाडा, हळदीचे रोपे, तिरडा, भाजीचे रोप याची विधिवत पूजा व आरती करून तीने रोपे तांब्यात पाच दगड व पाणी टाकून ते सर्व रोप टाकून न बोलता घरी आणला जातो. त्याचबरोबर प्रत्येक भागात विविध चालीरीती प्रमाणे गौराईला घरी आणत  गौरीचे स्वागत करताना, ज्या स्त्रीच्या हातात गौरी असतील, तिचे पाय पाण्याने धुवून औक्षण करत घराच्या उंबऱ्यापासून ते गौरी बसवण्याच्या जागेपर्यंत कण्याचे ठसे उमटवत आणले जाते.

गौरी पूजनाच्या दिवशी गौरींना साडी नेसवून, दागिने आणि मुखवटा घालून सजवले जाते. या दिवशी गौरींना भाजी- भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचबरोबर काही ठिकाणी मासांहाराचा नैवेद्याही दाखवला जातो. गौराई घरी आल्यानंतर घरात समृद्धी येते अशी लोकांची श्रद्धा असून पुढे गौरी विसर्जन होईपर्यंत फुगड्या व भजने करीत गौराईचा जागर केला जातो.

error: Content is protected !!