खारेपाटण संभाजीनगर येथील महामार्गाला नाल्याचे स्वरूप; अपघात होण्याची शक्यता

महामार्ग प्राधिकरणाचा भोंगळ कारभार ; प्रवाश्यांची तीव्र नाराजी व्यक्त
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण संभाजीनगर येथील महामार्गाला पावसाचे पाणी साचल्याने नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गेले काही दिवस सतत पाऊस पडत आहे. या पावसाचे पाणी संभाजीनगर येथील महामार्गवर पाणी निचरा होणारी मोरी तुंबल्याने पाणी साचून राहून येथे नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. महामार्गांवर या साचलेल्या पाण्यातून लोकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान खारेपाटण येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय असून येथील अधिकारी मुंग गिळून गप्प आहेत. तर मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गाच्या प्राधिकरणाच्या वतीने महामार्गाशी संलग्न असलेली बरीचशी कामे अपूर्ण ठेवलेली असून नागरिकामधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
येथे अपघात होण्याची देखील दाट शक्यता आहे. अपघात झाल्यास संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागाची राहिलं अशी तीव्र नाराजी प्रवासीवर्ग व्यक्त करत आहेत. तरी संबंधित विभागाने लवकरात लवकर ही अडचण दूर करून तुंबलेल्या मोऱ्या साफ करून महामार्गवर साचलेल्या पाण्याचा पूर्ण निचरा होईल अशी उपाययोजना करून महामार्ग वाहतुकीसाठी निर्धोक करण्याची मागणी होतं आहे.





