कणकवली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद…

सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे स्पर्धा संपन्न
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,सिंधुदुर्ग कणकवली तालुका क्रीडा परिषदेच्यावतीने सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे आयोजित बुद्धिबळ स्पर्धा स्पर्धेला विविध शाळातील स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून विविध कणकवली तालुक्यातील वयोगटातून ३० खेळाडूंची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या तालुकास्तरीय स्पर्धेत रूद्राक्ष राठोड ,कु.काव्या पारकर,सुश्रुत नानल, कु.मुग्धा साइल, हार्दिक परब, कु.मीनल सुळेभावी आदी खेळाडूंनी आपापल्या वयोगटातून अव्वल स्थान पटकावले आहे. प्रत्येक वयोगटातून एक ते पाच क्रमांक जिल्हास्तरावर कणकवली तालुक्याचे नेतृत्व करणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन जि. प सिंधुदुर्गचे माजी बांधकाम सभापती तथा नांदगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, चेअरमन नागेश मोर्ये यांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि ऑलिंपिक वीर पै. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. याप्रसंगी, नांदगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार सुभाष बिडये, कणकवली तालुका समन्वयक दत्तात्रय मारकड, शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी समन्वयक बयाजी बुराण, नांदगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर तांबे, सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव श्रीकृष्ण आडेलकर, क्रीडा शिक्षक सुदिन पेडणेकर, संजय सावळ, नांदगाव हायस्कूलचे क्रीडा शिक्षक संजय सावंत इतर क्रीडा शिक्षक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी विद्यालयातील विद्यार्थ्यिनींनी औक्षण करीत उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक सुधीर तांबे सर म्हणाले की, प्रत्येकाने खेळाकडे छंद म्हणून पहावे व सातत्याने सराव करत राहावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी खेळाडूंना केले.
चौकट
जिल्ह्याला अनेक उपक्रम देणारे नांदगावचे कोळंबा उत्कर्ष मंडळ
याप्रसंगी स्पर्धेचे उद्घाटक नागेश मोर्ये खेळाडूंना मार्गदर्शन करताना म्हणाले की, नांदगाव येथील कोळंबा उत्कर्ष मंडळांने क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणारे, क्रीडा मार्गदर्शकांना प्रोत्साहन देणारे आणि शिक्षण क्षेत्राला विशेष प्रेरणा देणारे अनेक उपक्रम जिल्ह्याला दिले असे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी काढून बुद्धिबळ स्पर्धेतील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
……………………………………
दरम्यान शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा कणकवली तालुका क्रीडा माजी समन्वयक बयाजी बुराण, कणकवली तालुका नूतन क्रीडा समन्वयक दत्तात्रय मारकड, बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव श्रीकृष्ण आडेलकर यांचा नागेश मोर्ये यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तालुका भरातून आलेल्या क्रीडा शिक्षकांचे मुख्याध्यापक सुधीर तांबे यांनी पुष्प देऊन स्वागत केले.
याप्रसंगी बयाजी बुराण व दत्तात्रय मारकड यांनीही मनोगत व्यक्त करून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नांदगाव हायस्कूलचे क्रीडा शिक्षक संजय सावंत यांनी केले.
कणकवली तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
14 वर्षाखालील मुलांमध्ये –
प्रथम-रुद्राक्ष राठोड (न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट), द्वितीय- गुणवंत पाटील (पोदार इंटरनॅशनल स्कूल कणकवली),
तृतीय- कार्तिकेय चव्हाण (सेंट उर्सुला स्कूल), चौथा -गौरेश तायशेटे( आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे), पाचवा- शिवम जाधव (एसएम हायस्कूल कणकवली),
14 वर्षाखालील मुलींमध्ये-
प्रथम- काव्या पारकर (सेंट उर्सुला स्कूल), द्वितीय-निर्झरा हुंबे (न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट), तृतीय-श्रेया डोर्ले (न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट) चौथी-सई सावंत (माध्यमिक विद्यालय कनेडी), पाचवी-गौरी सावंत (बी एन विजयकर इंटरनॅशनल स्कूल)
17 वर्षाखालील मुलांमध्ये –
प्रथम- सुश्रुत नानल (आयडियल स्कूल वरवडे) द्वितीय-योग कल्याणकर ( कासार्डे माध्यमिक विद्यालय), तृतीय- नील नलावडे (सेंट उर्सुला स्कूल),
चौथा-यश पवार (आयडियल स्कूल वरवडे),पाचवा- वरद तवटे (सेंट उर्सुला स्कूल)
17 वर्षाखालील मुलींमध्ये-
प्रथम-मुग्धा साईल (एस एम हायस्कूल कणकवली), द्वितीय-मनाली देसाई (एस एम हायस्कूल कणकवली), तृतीय-गार्गी सावंत (विद्यामंदिर इंग्लिश स्कूल कणकवली),चौथी-तनिष्का आडेलकर (विद्यामंदिर प्रशाला कणकवली),
पाचवी-नेहा गोसावी (न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट)
19 वर्षाखालील मुलांमध्ये –
प्रथम-हार्दिक परब (कणकवली कॉलेज कणकवली), द्वितीय-कौस्तुभ सामंत (कणकवली कॉलेज कणकवली), तृतीय-निष्क आराधकर (आयडियल ज्युनिअर कॉलेज वरवडे)
चौथा-लक्षण नांदगावकर (कासार्डे ज्युनिअर कॉलेज,कासार्डे), पाचवा-पुष्कर गुरव (वामनराव महाडिक ज्युनिअर कॉलेज तळेरे)
19 वर्षाखालील मुलींमध्ये-
प्रथम-मीनल सुळेभावी (कणकवली कॉलेज कणकवली), द्वितीय-सान्वी कारेकर (विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली) तृतीय-गायत्री राठोड (ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट),चौथी- वैभवी साठे (सरस्वती हायस्कूल नांदगाव),पाचवी-आराध्या ब्रह्मदंडे (कासार्डे ज्युनिअर कॉलेज,कासार्डे )
कणकवली तालुका समन्वयक दत्तात्रय मारकड माजी समन्वयक बयाजी बुराण यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न झाली. बक्षीस वितरण प्रसंगी नागेश मोर्ये, सुभाष बिडये, नांदगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधीर तांबे शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक व महासंघाचे जिल्हाध्यक्ष बयाजी बुराण, कणकवली तालुका क्रीडा समन्वयक दत्तात्रय मारकड व अन्य मान्यवरांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंना प्रमाणपत्र व पुष्प देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेला पंच म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव श्रीकृष्ण आडेलकर, नांदगाव हायस्कूलचे क्रीडा शिक्षक संजय सावंत, पंच राजेंद्र तवटे, सुदिन पेडणेकर, संजय सावळ,
जयश्री कसालकर ,विनायक पाताडे, मंदार परब, अजिंक्य पोफळे, सौ. सोनाली खडपकर, सौ. सायली गोरे, हनुमंत तांबट व कू.सानिका मारकड यांनी उत्कृष्ट कामगिरी पार पाडली.
ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्याबद्दल सर्व मान्यवरांचे पंच आणि क्रीडा शिक्षक आणि खेळाडूंची श्री. कारेकर यांनी आभार मानले व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करीत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.





