कणकवलीतील युवकाची गळफास घेत आत्महत्या

शहरातील-निम्मेवाडी येथील युवकाने घराच्या मांगरात लाकडीबारला गळफास घेत आत्महत्या केली. मिलिंद प्रकाश तावडे (36)असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मिलिंद याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिलिंद तावडे याने बुधवारी रात्री आरतीसाठी येणाऱ्या मंडळींसाठी बाजारातून प्रसाद घेऊन घरी आला. प्रसाद देऊन घरातून निघाला आरतीसाठी मिलिंद आला नाही. त्यानंतर त्याचा नातेवाईकांनी शोध घेतला असता घरामागील मांगरात एका लाकडी बारला त्याच्या मृतदेह गळफास अवस्थेत दिसून आला. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनस्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनाम केला. मिलिंद हा विवाहित असून तो प्लंबिंगची कामे करायाचा त्यामुळे त्याची शहरात ओळख देखील होती. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहीत बहीण असा परिवार आहे. मिलिंद याने टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण कळू शकले नाही. गणेश चतुर्थीच्या दिवशी ही घटना घडल्याने निम्मेवाडीत शोककळा पसरली आहे.





