कुडाळ तालुक्यातील २०२२ ते २०२५ मध्ये झालेल्या रस्ता कामांची चौकशी करा !

ठाकरे सेनेचे अतुल बंगे यांची मागणी

कुडाळ तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झालेल्या २०२२ ते २०२५ पर्यंत झालेल्या सर्वच रस्ता कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केली आहे.
श्री बंगे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जयकुमार पिसाळ यांनी कार्यभार स्विकारल्यापासुन कुडाळ तालुक्यातील रस्त्यांच्या कामांमधे मोठ्या प्रमाणात अपहार झाला असुन याची वाच्यता करुनही श्री पिसाळ यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. कुडाळ तालुक्यातील रस्त्यांची कामे होऊनसुध्दा रस्त्यांची चाळण झाली असुन नावाला कामांची एजन्सी दाखवुन आपल्याच विभागातील शाखा अभियंता कर्मचारी यांच्या मार्फत ठेके घेतले जातात. या मध्ये मुख्य सुत्रधार श्री पिसाळ असुन सन २०२२ ते २०२५ या कालावधीत झालेल्या रस्त्यांच्या कामांची चौकशी व्हावी. तसेच श्री. पिसाळ यांची या कुडाळ तालुक्यातुन बदली झाल्याशिवाय रस्त्यांच्या कामांमधील भ्रष्टाचार थांबणार नसुन आपण थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या कडे तक्रार करणार आहे. श्री पिसाळ यांचा कोणीतरी कर्ता करविता मंत्रालयात बसलेला आहे याची कल्पना आपल्याला आहे. तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने झालेल्या कामांच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढल्या शिवाय आपण गप्प बसणार नसल्याचे श्री. बंगे यांनी पत्रकात म्हटले आहे.

error: Content is protected !!