सिंधुदुर्ग राजाला नवसाचे ‘सोन्याचे पाऊल’

डॉ. जी. टी. राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग राजाची प्राणप्रतिष्ठापना
आमदार निलेश राणे हे निवडणुकीमध्ये निवडून यावेत असा नवस गेल्यावर्षी सिंधुदुर्ग राजाच्या चरणी भक्तांनी केला होता. भक्तांच्या हाकेला सिंधुदुर्ग राजा पावला आणि निलेश राणे कुडाळ – मालवण मतदारसंघाचे आमदार झाले त्यांचा हा नवस सिंधुदुर्ग राजाच्या प्राणप्रतिष्ठापाने दिवशी सोन्याचे पाऊल अर्पण करून फेडण्यात आला. ही प्रतिष्ठापना शहरातील प्रतिष्ठित डॉ. जी. टी. राणे यांच्या हस्ते करण्यात आली.
कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना गेली १६ वर्ष राणे कुटुंबीयांच्या माध्यमातून होत आहे. यावर्षी या गणेशोत्सवाला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे. यावर्षी खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे झाले आहेत. गेल्या वर्षी सिंधुदुर्ग राजाच्या चरणी कार्यकर्त्यांनी नवस केला होता की, निलेश राणे आमदार झाले तर सिंधुदुर्ग राजाचे पाऊल सोन्याचे बनवले जाईल. भक्तांच्या हाकेला सिंधुदुर्ग राजा पावला त्यामुळे हा नवस यावर्षी फेडण्यात आला
सिंधुदुर्ग राजाच्या चरणी आमदार निलेश राणे यांनी सोन्याचे पाऊल अर्पण केलेले हे पाऊल राकेश नेमळेकर यांनी गणरायाला परिधान केले. तसेच सिंधुदुर्ग राजाची प्राणप्रतिष्ठापना डॉ. जी. टी. राणे यांच्या हस्ते करण्यात आली. सिंधुदुर्ग राजाचे हे सोन्याचे पाऊल शहरातील सुवर्णकार राजू पाटणकर यांनी तयार केले आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, ओंकार तेली, जिल्हा परिषद माजी सभापती प्रितेश राऊळ, तालुका प्रमुख विनायक राणे, शहर प्रमुख अभी गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, तालुका सरचिटणीस राकेश कांदे, रचना नेरुरकर, रेवती राणे, राजेंद्र राणे, नागेश नेमळेकर, भूषण राणे, प्रसन्ना गंगावणे, बाळा कुडाळकर, संजू नेमळेकर, नागेश नेमळेकर, विनायक घाडी उपस्थित होते.
 
	




