खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांची भाजपा जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती

खारेपाटण येथील भाजपा बूथ अध्यक्षांच्या च्या वतीने प्राची इस्वलकर यांचा करण्यात आला सत्कार
खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी च्या सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. चिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे खारेपाटण येथील पाच महसूली गावांच्या भाजपा बूथ अध्यक्षानी खारेपाटण सरपंच तथा भाजपा जिल्हा चिटणीस प्राची इस्वलकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी उपसरपंच-महेंद्र गुरव, बूथ अध्यक्ष -इस्माईल मुकादम, शेखर कांबळे, विजय सावंत, शेखर शिंदे व इतर ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.





