खारेपाटण गाव महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी नंदकिशोर कोरगावकर यांची निवड

खारेपाटण गावच्या सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवारी खारेपाटण ग्रामपंचायची जनरल सर्वसाधारण सभा ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली. या सभेत खारेपाटण गावच्या म. गांधी तंटामुक्त समितीची निवड प्रक्रिया ग्रामविकास अधिकारी श्री विशाल वरवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी सर्वानुमते गावातील ज्येष्ठ नागरिक श्री .नंदकिशोर कोरगावकर यांची गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड केली.
खारेपाटण येथील सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. नंदकिशोर कोरगावकर यांची नुकतीच खारेपाटण गावच्या म. गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री. कोरगावकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी खारेपाटण उपसरपंच श्री महेंद्र गुरव, ग्रा. पं. सदस्य श्री. गुरुप्रसाद शिंदे, जयदीप देसाई, किरण कर्ले, सुधाकर ढेकणे, सौ. अस्ताली पवार,सौ. शितिजा धुमाळे, श्रीम. धनश्री ढेकणे गावचे पोलिस पाटील ओंकार चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते श्री. मंगेश गुरव, महेश कोळसुलकर, संतोष पाटणकर, सुधीर कुबल, संकेत शेट्ये, यांसह प्राथमिक शिक्षक,अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, महिला बचत गटाच्या प्रतिनिधी विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





