नागरिकांची मागणी, आणि कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची तात्काळ तत्परता!

कणकवली शहरातील जळकेवाडी नाथ पै नगर गणपती सान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्वखर्चातून जीएसबीएम

या भागातील रहिवाशांनी मानले समीर नलावडे यांचे आभार

गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असतानाच कणकवली शहरातील जाळकेवाडी, नाथ पै नगर येथील रहिवाश्यांनी तेथील गणपती सान्याची डागडुजी करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे केली होती. त्या मागणीनुसार आज समीर नलावडे यांच्या माध्यमातून स्वखर्चातून जळकेवाडी, नाथ पै नगर मधील रहिवाशांच्या मागणीनुसार गणपती सान्याकडे जाणाऱ्या रस्त्याची जेसीबी द्वारे साफसफाई करून तेथील रस्त्यावर जीएसबीएम करून देण्यात आले. त्यामुळे गणपती विसर्जना करिता या गणपती सान्यावर जाणाऱ्या गणेश भक्त नागरिकांची होणारी गैरसोय टाळणार आहे. भाजपाचे कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे व भाजपा कार्यकर्ते अमोल रासम यांनी या ठिकाणी थांबून हे काम करून घेतले. याबद्दल या भागातील रहिवाशांनी श्री नलावडे यांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!