कळसुलीतील आरोग्य शिबिराचा 53 रुग्णांनी घेतला लाभ

एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आयोजन

एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कळसुली येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. कळसुली सरपंच सचिन पारधीये यांच्या संकल्पनेतून हे शिबिर घेण्यात आले असून, डोळ्यांचे, हाडांचे आजार सिटीस्कॅन, एम आर आय, यासह रक्त तपासणी देखील यावेळी आवश्यकतेनुसार करण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार या रुग्णांवर उपचार देखील करण्यात आले. कळसुली गावां मधील 53 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी विष्णू गोसावी, विकास लुडबे, रितेश घाडीगावकर, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र सावंत, ग्रामपंचायत सदस्य दीपक मेस्त्री आदींचे सहकार्य लाभले. या शिबिराबद्दल ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले.

दिगंबर वालावलकर / कणकवली

error: Content is protected !!