सिंधुदुर्ग पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर

पालकमंत्र्यांकडून मटका बुकिं वर धाड
पोलीस प्रशासनाची अक्षरशा धावपळ
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज सिंधुदुर्ग पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगत कणकवली बाजारपेठेतील मटका बुकी वर धाड टाकली. बाजारपेठेमध्ये मटका बुकिंकडून खुलेआम मटक्याचे काम स्वीकारले जात असताना पालकमंत्र्यांना थेट समोर हजर झाल्याचे पाहून अनेकांचे धाबे दणाणले. या प्रकारांने सिंधुदुर्ग पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेतेय त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान पालकमंत्र्यांनी स्वतः मटका सुरू असल्याचे दाखवून देण्यासाठी दस्तुरखुद्न स्वतःच बुकीवर रेड केल्याने कणकवली पोलीस निरीक्षकांसह पोलीस प्रशासनाची अक्षरशः धावपळ झाली.





