कणकवली रेल्वे स्टेशनवर अधिकृत रिक्षा स्टॅन्ड चा शुभारंभ

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते रिक्षा स्टॅन्ड चे लोकार्पण

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून रीक्षा स्टॅन्डला मंजुरी

कणकवली रेल्वे स्टेशन या ठिकाणी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून रिक्षा स्टॅन्ड मंजुरी झाले. या रिक्षा स्टॅन्ड चा शुभारंभ कणकवली ची माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला. या रिक्षा स्टॅन्ड च्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचणे सोपे जाणार आहे. या ठिकाणी रिक्षा लावल्या जात असल्या तरी अधिकृत स्टॅन्ड ची मंजुरी नव्हती. त्याला कागदोपत्री मंजुरी देत हे स्टॅंड लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण प्रसंगी उपनगराध्यक्ष बंडु हर्णे, रिक्षा चालक मालक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हाध्यक्ष नागेश ओरोसकर, माजी नगरसेवक आबिद नाईक, माजी नगरसेवक व गटनेते संजय कामतेकर, रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक राजेश सुरवडे, अधिकारी जी.पी प्रकाश, रिक्षा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश आमडोसकर, संजय मालंडकर, सुरेश सावंत, धोंडी सापळे, व सर्व रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना रेल्वे स्टेशन रिक्षा स्टँड चे अध्यक्ष संतोष सावंत यांनी केली. सुत्रसंचालन व आभार बाळु वालावलकर यांनी मानले.

error: Content is protected !!