आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये साजरी झाली चिमुकल्यांची दहीहंडी

कणकवली/मयूर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे येथे चिमुकल्यांचा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला
विष्णुचा आठवा अवतार आणि जगतगुरू श्रीकृष्णाचा जन्मदिवस गोकुळ अष्टमी आणि गोपाळकाला निमित्त प्रशालेतील ज्यूनियर व सीनियर के.जी. च्या विद्यार्थ्यांनी कृष्ण व राधा यांच्या वेशभूषा केल्या होत्या. कृष्ण जन्माचे नृत्य व त्यानंतर दहीहंडी फोडत चिमुकल्यांनी गोपाळकाला साजरा केला
सण व उत्सवाचे महत्व मुलांना बालवयात समजले पाहिजे अशा उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल, संस्थेचे सल्लागार डी.पी तानवडे सर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई,तसेच को ओर्डीनेटर श्री.निलेश घेवारी सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.वैष्णवी मोरवेकर मॅडम,शिक्षक, विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फातिमा कुडाळकर मॅडम यांनी केले





