अणूउर्जेचा येतोय असूर झोपेत राहू नका

मुणगे येथील महाजन बंधूंचे गाणे झालेय चर्चेचा विषय

मुणगे येथील राम आणि शाम बंधूंनी रचलेला आणि गायलेला अणूउर्जेचा येतोय असूर झोपेत राहू नका चला एकजूट होऊनी सर्वांनी त्याला दाखवू कोकणी हिसका हे गीत सोशल मिडियावर चांगलेच प्रसिद्ध होत असून, अनेकांनी स्टेटस ठेवत अणूऊर्जा प्रकल्पाला असलेला आपला विरोध अशाप्रकारे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी अणूऊर्जा प्रकल्पाबाबत स्पष्टीकरण देवूनही या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या मनात असलेली भीती तसूभरही कमी झाली नसल्याचे सोशल मीडियावरील अनेक ग्रुप वर सुरू असलेल्या सावधानतेच्या चर्चेतून स्पष्ट होत आहे. अनेकजण एकत्र येऊन लढण्यासाठी आवाहन करत आहेत. अशा परीस्थितीत मुणगे येथील महाजन बंधूंचे गीत प्रेरणादायी असल्याचे या गीताला मिळत असलेल्या प्रतिक्रियांवरुन दिसून येत आहे. मुणगे येथील महाजन बंधू भजन कलावंत म्हणून सुपरिचित आहेत.ते भगवती देवीच्या पालखी सोहळ्यातही आपली गायन कला सादर करत असतात. मुणगे येथे औष्णिक प्रकल्प चर्चेमुळे त्यांच्यातील कवी जागृत होत मोहमायेचा बाजार सारा गाफिल राहू नका असे आवाहन करत ते जागृती करत आहेत. सध्या त्यांचे गाणे खुपच प्रसिद्ध होत असून औष्णिक विरोधी लढ्यात बळ देणारे असल्याचे महाजन बंधू सांगतात.

error: Content is protected !!