कळसुलीत रंगणार भव्य दहीहंडी चा थरार

प्रेम दया प्रतिष्ठान मुंबई आणि श्री. स्वामी समर्थ मठ सिंधुदुर्ग यांचे आयोजन
कणकवली/मयूर ठाकूर.
प्रेम दया प्रतिष्ठान (रजि)मुंबई, श्री स्वामी समर्थ मठ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कळसुली कणकवली ग्रामीण भागात भव्य दहीहंडी उत्सव 2025 वर्ष 2 , शनिवार 16ऑगस्ट 2025 सायंकाळी 5 .00 ते 9.00 श्री. स्वामी समर्थ मठ कळसुली घोडगे रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. दहीहंडीसाठी विजेत्याला 55 हजार 555 रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
प्रेम दया प्रतिष्ठान मुंबई, आणि श्री स्वामी समर्थ मठ सिंधुदुर्गचे हे 2वे वर्ष आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी उत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी,मुंबई, गोविंदा पथकाना सहभागी होता येणार आहे.
याप्रसंगी आठ थरांचे मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा गोविंदा पथकाला 55हजार 555व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
यावेळी दुपारी 4.00 वा. प्रेम दया प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष श्री.हनुमंत सावंत व उपस्थित प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते दहीहंडीचा श्रीफळ वाढवून शुभारंभ होणार आहे.
नृत्य अविष्कार सादर होणार आहे.तरी दहीहंडी उत्सवामध्ये कळसुली पंचक्रोशीसह जिल्ह्यातील गोविंदा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन प्रेम दया प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी किरण सावंत.9403717460, ओमकार दळवी.9405239966, राकेश पवार.9226561993 यांच्या जवळ संपर्क साधावा.
विराज गोसावी l प्रतिनिधी





