कवठी-चेंदवण मध्ये अवैध वाळू उत्खननावर कारवाई

महसूल विभागाने रॅम्प उध्वस्त केले

तालुक्यातील कवठी व चेंदवण परिसरात कर्ली नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर महसूल विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईत चेंदवण येथील वाळूचे सहा रॅम्प तर कवठी येथील दोन वाळूचे रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आले.
हि कारवाई उपविभागीयअधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे, तहसिलदार विरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत निवासी नायब तहसिलदार अमरसिंह जाधव, वालावल मंडळ अधिकारी श्वेता दळवी, ग्राम महसूल अधिकारी भरत नेरकर, सोनाली मयेकर, स्नेहल सागरे, शिवदास राठोड यांच्या पथकाने चेंदवण येथील वाळूचे सहा रॅम्प तर कवठी येथील वाळूचे दोन रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आले.
दरम्यान तहसिलदार विरसिंग वसावे यांनी बेकायदा वाळू उत्खनन थांबविण्यासाठी परिसरात गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी विशेष पथकाचे आदेश केलेले आहेत. यामुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

error: Content is protected !!