आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत कुडाळात शिवसेनेची रिक्षा रॅली

कुडाळात नारळी पौर्णिमेचा उत्साह

आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत आज कुडाळ मध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त शहरातून रिक्षा रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेने बरोबरच भाजपचे पदाधिकारी सुद्धा उत्साहाने रॅली मध्ये सहभागी झालेले दिसले. आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण होते. यावेळी कुडाळ पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
नारळी पौर्णिमा उत्सव कुडाळ मध्ये मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आला. रिक्षा रॅली हे कुडाळचे नारळी पौर्णिमा सणाचे वैशिट्य असते. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज रिक्षा रॅली काढून आमदार निलेश राणे आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भंगसाळ नदीला नारळ अर्पण करण्यात आला.
गेल्यावर्षी नारळी पौर्णिमेला दोन गटांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर यंदा कुडाळ मध्ये रिक्षा रॅली काढण्यावर कुडाळ पोलिसांकडून निर्बंध घालण्यात आले होते. पण नंतर गुरुवारी ते निर्बंध उठवण्यात आले. पण हे शिवसेना शिंदे गटाला हि निर्बंध मान्य नव्हते. त्यांनी रॅली काढणारच असे सांगितले होते. पण निर्बंध उठल्यामुळे आज शिवसेना शिंदे गटाला सायंकाळी ४ वाजताची वेळ देण्यात आली होती. सायंकाळी ४ वाजता महायुतीच्या कार्यालयाकडून या रॅलीला सुरुवात झाली.
रॅलीसाठी दोन रिक्षा फुलांनी सजविण्यात आल्या होत्या. पहिल्या रिक्षेवर हंड्यामध्ये मानाचे श्रीफळ ठेवण्यात आले होते. प्रत्येक रिक्षेवर शिवसेनेचा भगवा धनुष्यबाण सह फडकत होता. या दोन रिक्षा रॅलीच्या पुढे होत्या. त्यांनतर रांगेत रॅली सुरु झाली. महायुती कार्यालयाकडून निघालेली रॅली एसटी स्टॅन्ड वरून बाजारपेठ मार्गे पान बाजारातून गुलमोहोर हॉटेल कडून एसटी डेपो कडून मार्गस्थ झाली. आमदार निलेश राणे येईपर्यंत सर्व रिक्षा आणि पदाधिकारी एसटी डेपोकडे थांबले होते. तोपर्यंत उबाठा गटाची रॅली त्यांच्या समोरून मार्गस्थ झाली. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पण पोलिसांनी चांगले नियोजन केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
आमदार निलेश राणे आणि सर्व कार्यकर्ते महामार्गावरील भंगसाळ पुलावर गेले तिथे सजविलेल्या रिक्षावर असलेले मानाचे श्रीफळ निलेश राणे यांच्या हस्ते भंगसाळ नदीला विसर्जित करण्यात आले. कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली योग्य नियोजन झाल्यामुळे कोणतेही गालबोट न लागता हि रॅली शांततेत पार पडली. यावेळी आमदार निलेश राणे यांच्यासह, संजय आंग्रे, दत्ता सामंत, विनायक राणे, दीपक नारकर, आनंद शिरवलकर, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे, विलास कुडाळकर, चांदणी कांबळी, नयना मांजरेकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!