कुडाळमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त दोन्ही रॅली शांततेत

एसटी डेपोजवळ दोन्ही गट एकत्र आल्याने काही काळ तणाव
कुडाळ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीतने कार्यकर्त्यात उत्साह
गेल्या वर्षीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला कुडाळ पोलिसांनी दोन्ही गटांच्या रिक्षा रॅलीवर घातलेले निर्बंध. नंतर ते निर्बंध शिथिल केल्यावर आज दोन्ही गटाच्या रिक्षा रॅली वेगवेगळ्या वेगळेत निघाल्या खऱ्या, पण कुडाळ एसटी डेपो जवळ या दोन्ही रॅली एकत्र आल्यावर मटार काही काळ तणावाचे वातावरण बनले होते. पण पोलिसांचे योग्य नियोजन आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या समजुदारपणा यामुळे आजच्या रॅली शांततेत पार पडल्या.
नारळी पौर्णिमा सणाला काढण्यात येणारी रिक्षा रॅली हि जणू कुडाळ शहराची परंपरा बनली आहे. पण चार दिवसांपूर्वी पोलिसांनी या रॅलीवर निर्बंध घातले. कारण होत गेल्या वर्षी रॅली दरम्यान दोन गटात झालेला वाद. पोलिसांनी दोन्ही गटांची बैठक घेऊन त्याना फक्त एक रिक्षा घेऊन रॅली काढण्याच्या सूचना दिल्या. शिवसेना उबाठा गटाने हि सूचना मान्य केली पण शिंदे गटाने मात्र रॅलीचा आग्रह शेवटपर्यंत कायम ठेवला. शेवटी नारळी पौर्णिमा सणाच्या आदल्या दिवशी गुरुवारी कुडाळ पोलिसांनी हे निर्बंध हटवले. त्या प्रमाणे पोलिसानी दोन्ही गटांना वेगवेगळी वेळ दिली. शिवसेना शिंदे गटाची रॅली सायंकाळी ४ वाजता महायुतीच्या कार्यालयाकडून भंगसाळ नदीच्या दिशेने रवाना झाली. कुडाळ एसटी स्टॅन्ड, बाजारपेठ, पान बाजार, गुलमोहोर नाका, एसटी डेपो पर्यंत हि रॅली आल्यानंतर आमदार निलेश राणे येईपर्यंत सर्व रिक्षा आणि पदाधिकारी एसटी डेपोच्या पटांगणात थांबले. पण तोपर्यंत शिवसेना उबाठा गटाच्या रॅलीची वेळ झाली. त्यांना सायंकाळी ५ वाजताची वेळ दिली होती. ते वेळेत निघाले मार्ग तोच. कुडाळ कुडाळ एसटी स्टॅन्ड, बाजारपेठ, पान बाजार, गुलमोहोर नाका, एसटी डेपो आणि नंतर भंगसाळ नदी पर्यंत. उबाठाची रॅली एसटी डेपोच्या जवळ आली आणि तिथेच थांबली. काही अंतरावर एसटी डेपो पटांगणात शिवसेना शिंदे गटाची रॅली पदाधिकारी आमदार निलेश राणेंची वाट बघत होते. तर उबाठावाले माजी आमदार वैभव नाईक यांची वाट बघत होते. काही काळ कोणालाच काही कळेना. वातावरण तणावपूर्ण झाले. दोन्ही कडचे डीजे जोरात गाणी वाजवू लागले. काही वेळातच माजी आमदार वैभव नाईक आले आणि थांबलेली उबाठाची रॅली पुन्हा मार्गस्थ झाली. हि रॅली शिवसेनेच्या रॅली समोरून जाताना काही क्षण तणावाचं होते. शिवसनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पण पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली. उबाठाच्या दोन रिक्षा नदीला नारळ अर्पण करण्यासाठी नदीच्या दिशने गेल्या तर बाकीच्या रिक्षांना पोलिसांनी महामार्गावरून सहाराच्या दिशने वळविले. काही वेळाने आमदार निलेश राणे सुद्धा आले. त्यांनी कार्यकर्त्यांसोबत जात भंगसाळ नदीला नारळ अपूर्ण केला. रॅली विसर्जित झाली. .सर्वानीच सुकेच निश्वास सोडला. पण पोलिसांचे नियोजन आणि कार्यकर्त्यांचा समजूतदारपणा जिंकला असेच म्हणावे लागेल.




