कुडाळ मध्ये शिवसेना उबाठा गटाची रिक्षा रॅली उत्साहात

माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती

नारळी पौर्णिमा उत्सव कुडाळ मध्ये मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आला. रिक्षा रॅली हे कुडाळचे वैशिट्य असत. शिवसेना उबाठा गटाच्या वतीने आज रिक्षा रॅली काढून माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह उबाठाच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भांगसाळ नदीला नारळ अर्पण करण्यात आला. यावेळी कुडाळ पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
गेल्यावर्षी नारळी पौर्णिमेला दोन गटांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर यंदा कुडाळ मध्ये रिक्षा रॅली काढण्यावर कुडाळ पोलिसांकडून निर्बंध घालण्यात आले होते. पण नंतर गुरुवारी ते निर्बंध उठवण्यात आले. आणि दोन्ही गट रॅली काढणार असे ठरले होते. त्या प्रमाणे आज शिवसेना उबाठा गटाला सायंकाळी पाच वाजताची वेळ देण्यात आली होती. शिवसेना उबाठा कार्यालयाकडे वेळेआधीच रॅलीसाठी रिक्षा येऊ लागल्या. उबाठा शिवसेना कार्यालयाकडे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. पाच वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि श्रीफळ वाढवून रॅलीला सुरुवात झाली.
दोन रिक्षा फुलांनी सजविण्यात आल्या होत्या. पहिल्या रिक्षेवर हंड्यामध्ये मानाचे श्रीफळ ठेवण्यात आले होते. त्या दोन रिक्षा रॅलीच्या पुढे होत्या. त्यांनतर रांगेत रॅली सुरु झाली. शिवसेना उबाठा कार्यालयाकडून निघालेली रॅली एसटी स्टॅन्ड वरून बाजारपेठ मार्गे पान बाजारातून गुलमोहोर हॉटेल कडून एसटी डेपो कडून मार्गस्थ झाली. एसटी डेपोच्या अलीकडे रॅली थांबविण्यात आली. माजी आमदार वैभव नाईक या ठिकाणी रॅलीत सहभागी झाले. मग घोषणा देत डीजेच्या दणदणाटात रॅली भांगसाळ नदीच्या दिशेने मार्गस्थ झाली.
दरम्यान ४ वाजता रॅलीने गेलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या रिक्षा आणि पदाधिकारी याना कुडाळ एसटी डेपोच्या आवारात थांबवून ठेवण्यात आले होते. पण त्यांच्या समोरून उबठाची रॅली जाताना काही काळ घोषणाबाजी झाली. पण पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे रॅली शांततेत भंगसाळ नदीकडे पोहोचली. त्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत मानाचे श्रीफळ नदीला अर्पण करण्यात आले. दरम्यान मानाचा नारळ असलेल्या दोन रिक्षा वगळता बाकीच्या रिक्षांना महामार्गावरून कुडाळ शहराकडे वळविण्यात आले. कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली योग्य नियोजन झाल्यामुळे कोणतेही गालबोट न लागता हि रॅली शांततेत पार पडली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, उप जिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, अतुल बंगे, नगरसेवक मंदार शिरसाट, संतोष शिरसाट, बबन बोभाटे, बाळा कोरगावकर, संदीप म्हाडेश्वर, गंगाराम सडवेलकर, शेखर गावडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!