खारेपाटण शिक्षण प्रसारक मंडळ प्राथमिक विभागाच्या इ.पहिली ते चौथीच्या मुलांना शालेय ओळखपत्र व खाऊ वाटप

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक योगेश गोडवे यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप
खारेपाटण गावचे राहिवासी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक, पत्रकार, रोटरी क्लब खारेपाटण चे पब्लिक इमेज चेअरमन योगेश गोडवे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक विभाग इ. पहिली ते चौथीच्या मुलांना शालेय ओळखपत्र व खाऊ वाटप करण्यात आले. योगेश गोडवे यांच्या सौजन्याने रोटरी क्लब खारेपाटण यांनी हा उपक्रम राबवला. यावेळी खारेपटन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष प्रवीण लोकरे सचिव महेश कोळसूलकर उपाध्यक्ष भाऊ राणे संचालक विजय देसाई आत्माराम कांबळे, रोटरी क्लब ऑफ खारेपाटन प्रेसिडेंट दयानंद कोकाटे, सचिव अजय गुरसाळे, ट्रेझरर सारिका महिंद्रे सार्जंट ॲट आर्म यशवंत रायबागकर, मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, रोटरियन काझी मॅडम, रोटरीयन अमृते मॅडम, रोटरीन सुबोध देसाई , रोटरीयन मंगेश गुरव,प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. वृषाली दर्पे मॅडम गुरव मॅडम उपस्थित होते.





