कणकवली तालुक्यात महाराजस्व अभियानांतर्गत महसूल प्रशासनाची जनतेला थेट सेवा

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आज कणकवलीमध्ये अपडेशन कॅम्प
कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची माहिती
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे राज्यात दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी महसूल दिन व दिनांक 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत “महसूल सप्ताह -2025” साजरा करणेबाबत शासनाने सूचना दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या नुसार कणकवली तालुक्यातील सर्व ९ मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत महसूल प्रशासनाच्या सेवा व योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यामध्ये सातबारा वाटप, वारस फेरफार, मंजूर फेरफाराची प्रत, संजय गांधी योजना चे मंजूर लाभार्थी यांना मंजुरीचे पत्र, जातीचे दाखले, उत्पन्न व वय अधिवास दाखले, कलम 155 अंतर्गत सातबारा दुरुस्तीचे आदेश, केंद्रीय पेन्शन योजनाचा लाभ घेण्यासाठी सत्यापन ॲप द्वारे हयात दाखला देणे, इत्यादी लाभ देण्यात आले.
याप्रसंगी मंडळातील मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. महसूल सप्ताह च्या अनुषंगाने दिनांक 5 ऑगस्ट रोजी संजय गांधी योजनेतील ज्या लाभार्थी यांना आधार अपडेट नसल्याने DBT द्वारे पेन्शन मिळत नाही अशा लाभार्थ्यांसाठी तहसील कार्यालय कणकवली येथे आधार अपडेशन कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. तरी ज्या लाभार्थ्यांचे आधार अपडेट करायचे राहून गेले आहे त्यांनी या कॅम्प चा लाभ घ्यावा असे आवाहन तहसील कार्यालय कणकवली मार्फत करण्यात आले आहे.
- सातबारा/8अ व फेरफार — 181
- उत्पन्न दाखले — 33
- संजय गांधी /श्रावणबाळ योजना मंजूर आदेश 38
- वारस अर्ज कार्यवाही — 9
- कलम 155 अंतर्गत अर्ज — 6
- सत्यापन app हयात प्रमाणपत्र — 23
- जातीचे दाखले — 6
- वय अधिवास — 5
- NCL — 3
अशा प्रकारे ही योजना राबविण्यात आली आहे.





