कणकवली शहरातील हायवेची स्ट्रीट लाईट बंद

महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार कंपनीचे दुर्लक्ष

आंदोलन केल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?

गेले काही दिवस सातत्याने लक्ष वेधल्यानंतरही कणकवली शहरातील व शहरातील सर्विस रस्त्या लगतच्या काही भागातील स्ट्रीट लाईट अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे सर्वसामान्य जनतेला व शहरवासीयांना हायवेच्या भोंगळ कारभाराचा त्रास सहन करावा लागत आहे. कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज वरील स्ट्रीट लाईट पूर्णतः आज सायंकाळपासूनच बंद स्थितीत होती. तर सर्विस रस्त्यावरील देखील नरडवे नाक्यापासूनची स्ट्रीट लाईट बंद स्थितीत असल्याने या काळोखातूनच शहरवासीयांना व सर्व सामान्य प्रवाशांना जावे लागत आहे. आंदोलन केल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!