आमदार वैभव नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

जिल्हाभरातून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची शुभेच्छा देण्यासाठी रीघ

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज रविवारी सकाळ पासूनच आमदार वैभव नाईक यांच्यावर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रम प्रसंगी जिल्हाभरातून कार्यकर्ते पदाधिकारी व हितचिंतकानी आमदार वैभव नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी हितचिंतक व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार वैभव नाईक यांचा केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक, मुलगी नंदिनी नाईक, मुलगा राजवर्धन यांच्यासह नाईक कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी गोवा येथील कलाकारांचा संगीत रजनीचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!