आचरा येथे महसूल सप्ताहानिमित्त विविध दाखल्यांचे वाटप

आचरा-अर्जुन बापर्डेकर
महसूल सप्ताहानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सोमवारी आचरा येथे सर्व प्रकारचे शासकीय दाखला वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांना डिजिटलायझेशन बाबत महसूल कडून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी नागरिकांना उत्पन्न दाखला, नॉन क्रिमीलेअर, दाखला जात दाखला, वाटप करण्यात आले सर्व प्रकारच्या योजनांचे फॉर्म वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ न्यू इंग्लीश स्कूल आचरा चे मुख्याध्यापक अंकुशराव घुटुकडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आचरा तलाठी श्रीम. एन एच शिरसाट ,गाऊडवाडी तलाठी संजय गनगे सडेवाडी तलाठी आकाश कराळे व आचरा हद्दीतील सर्व पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, विठ्ठल धुरी, सुनील खरात यांसह अन्य पोलीस पाटील , कोतवाल तसेच लाभार्थी बहुसंख्येन उपस्थित होते.