पालकमंत्री मा श्री.नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील भजन मंडळांना मिळणार अनुदान.

भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष बुवा श्री.संतोष कानडे यांच्या पाठपुराव्याने मिळणाऱ्या अनुदानासाठी वरील अर्ज भरून ग्रामपंचायत कार्यालय येथे जमा करण्याचे आवाहन.
कणकवली/मयूर ठाकूर मागील दोन वर्षापासून जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून जिल्ह्यातील लाभार्थी भजनी मंडळांना भजनी साहित्य प्राप्त होते.भजनी कलाकार संस्थेचे संस्थाध्यक्ष बुवा श्री.संतोष कानडे यांनी पालकमंत्री मा श्री. नितेशजी राणे साहेब यांच्याकडे साहित्य वाटप न करता भजनी मंडळांना अनुदान प्राप्त व्हावे अशा प्रकारची मागणी केली होती. पालकमंत्री महोदयांनी ही मागणी तात्काळ मान्य करत जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तसे आदेश निर्गमित केले.बुवा श्री.संतोष कानडे यांच्या मागणीला यश आले असून अनुदान प्राप्त करण्यासाठी भजन मंडळींनी वरील अर्ज भरून ग्रामपंचायत कार्यालय येथे त्वरित जमा करावा तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त भजन मंडळांनी यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष बुवा श्री.संतोष कानडे यांनी केले आहे.