पाटगाव सर्कल अंतर्गत फणसगाव येथे महसूल सप्ताहानिमित्त विविध दाखल्यांचे वाटप

आचरा-अर्जुन बापर्डेकर
छत्रपति शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत फणसगाव हायस्कूल येथे विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरवात विठ्ठलादेवी सरपंच ज्योती नारकर व फणसगाव सरपंच शितल पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत मंडल अधिकअधिकारी भोये, विठ्ठलादेवी उपसरपंच गणेश नारकर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नारकर, प्राचार्य पाटील, धालवली ग्राममहसूल अधिकारी सुनीता मेस्त्री, ग्राममहसूल अधिकारी प्रथमेश आसोलकर, डगरे, राणे, डवरे, गोसावी, देवगडे, धनावटे, कोतवाल प्रकाश घाडी, लक्ष्मण घाडी, विवेक भोगटे, संतोष महाडीक, हर्षदा राणे, पोलीस पाटील अविनाश पाटील, स्वप्नील नारकर, सौ जयवंती नर, अखिल सोलकर, साक्षी मांजरेकर, यांसह ग्रामस्थ आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना मंडल अधिकारी यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रथमेश आसोलकर यांनी महसूलच्या डिजिटल सेवांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सुनिता मेस्त्री यांनी तर आभार समिक्षा राणे हिने माणले.

error: Content is protected !!