हळवल ग्रामपंचायत येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज “महाराजस्व” अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

राज्याच्या महसूल योजनांची माहिती देत महसूल सप्ताहानिमित्त राबविला उपक्रम.

कणकवली/प्रतिनिधी महसूल दिनानिमित्त संपूर्ण राज्यभरात महसूल सप्ताह सुरु आहे.यानिमित्त विविध उपक्रमांच आयोजन करण्यात आलेलं असून नागरिकांचा सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.नुकतेच 4 ऑगस्ट रोजी कणकवली तालुक्यातील हळवल ग्रामपंचायत येथे वागदे मंडळ आणि कळसुली मंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज “महाराजस्व अभियान” राबविण्यात आले.राज्याच्या महसूल योजनांची माहिती यामध्ये नागरिकांना देण्यात आली.यनिमित्ताने तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांकडून ७/१२ उतारे,फेरफार,Ews प्रमाणपत्र वाटप,संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांच्या दाखल्यांचे वाटप,ॲग्री स्टॅक ओळखपत्र तयार करणे तसेच विविध महसूल योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली असून हे अभियान दिवसभर हळवल ग्रामपंचायत येथे संपन्न होणार आहे.वागदे मंडळ अंतर्गत हळवल,वागदे,बोर्डवे,शिरवल,ओसरगाव आणि कळसुली मंडळ अंतर्गत शिवडाव,दारिस्ते,कळसुली हे गाव या अभियानात सहभागी झालेले आहेत.
या अभियानाला नायब तहसीलदार श्री.गंगाराम कोकरे रावसाहेब उपस्थित राहिले तसेच उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले.तसेच मंडळ अधिकारी किरण गावडे,ग्राम महसूल अधिकारी शुभम भालेराव,ओमकार लोखंडे,भारत नेवारे,राकेश इंकर,श्रद्धा कोरगावकर,शरयू शिवणकर,उमेश सिंगनाथ,कळसुली पोलीस पाटील महेश केसरकर,ओसरगाव पोलीस पाटील संजना आंगणे,हळवल पोलीस पाटील विक्रांत ठाकूर,शिवडाव पोलीस पाटील मयूर ठाकूर तसेच कोतवाल मिलिंद कदम शिवडाव,कोतवाल सखाराम गावकर कळसुली,कोतवाल विठ्ठल येंडे बोर्डवे आणि हळवल ग्रामपंचायत सरपंच सौ.अर्पणा अशोक चव्हाण,उपसरपंच श्री.प्रभाकर श्रीधर राणे,ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती.वर्षा प्रकाश कदम,तंटामुक्ती अध्यक्ष श्री.अविनाश अर्जुन राणे,सदस्य श्री.अनंत यशवंत राणे,हळवल ग्रामपंचायत माजी उपसरपंच श्री.लक्ष्मण मनोहर गावडे तसेच शिवडाव,दारिस्ते,कळसुली,हळवल वागदे,बोर्डवे,शिरवल या सर्व गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!